नंदुरबार l प्रतिनिधी
२ मार्च १९४३ आली ब्रिटिशांचा गोळीबारात रावळापाणी येथे १४ जणांवर ब्रिटिश अधिकारी कॅप्टन ड्युमन यांनी गोळीबार केला व तेथील १४ जणांना ठार केले तेथे १४ जण हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यांना दरवर्षी श्रद्धांजली वाहण्यात येते. त्या ठिकाणी जाऊन आप परिवार आदरांजली वाहत असतात.
४ मार्च १९४३ रोजी शिवरात्री होती त्याशिवरात्रीच्या दिवशी रंजनपुर येथे आरती पूजन होते. त्या आरती पूजनासाठी २ मार्च १९४३ रोजी आप समाज व तात्कालीन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब ठकार यांनी दोन वर्षाची हद्दपार शिक्षा भोगत असलेले संत रामदास महाराज यांना आवाहन करीत क्रांतिकारकांना मोठे बळ देण्याच्या हेतूने क्रांतीकारकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा हेतूने वाटचाल करणाऱ्या या समाजाला बन तालुका तळोदा येथून पाच किमी अंतरावर असलेल्या निझरा नाल्याच्या पात्रात असणाऱ्या रावळपाणी येथे मुक्कामाला असणाऱ्या हजारोंच्या संख्येने असलेल्या समाजावर जो समाज ४ मार्च १९४३ रोजी शिवरात्रीच्या दिवशी रंजनपुर मोरवड येथे पोहोचणार होता.
त्या आधी सकाळी सकाळी हा समाज मार्गक्रमण करीत असताना सामान्य जनतेवर दहशत निर्माण करावी म्हणून गोळीबार केला.अमृतसर येथील जालियनवाला बागेला जसा गोळीबार झाला होता. व जालियनवाला बागेत कॅप्टन डायर होता तर रावळपाणी येथे गोळीबार करणारा कॅप्टन ड्युमन हा होता. गोळीबार होणार याची संत रामदास महाराज यांना कल्पना होती संत रामदास महाराजांनी आपल्या भक्त गणाला पूर्वकल्पना दिली होती.
मात्र भक्तगण न डगमगता माणूसतिच्या नात्याने ह्या घटनेला सामोरे जात असताना ‘गांधीबाबा जिंदाबाद’ रामदास बाबा जिंदाबाद’ अशा घोषणा देत असल्याच्या नोंदी या ठिकाणी सापडल्या आहेत. या गोळीबारात १५ नागरिक ठार झाल्याची नोंद आहे. त्यात देवीसिंग केवजी (छोटा धनपूर), राजाराम देवीसिंग (छोटा धनपूर) शिवदास जयराम ठाकरे (गुंजाळी) फत्तेसिंग सुंदरा वळवी (लंगडी गुजरात पिसावर) नुरका जत्रा पाडवी (नवलपूर गुजरात) भरण्या भाग्या वळवी (ज्यानीआंबा) सुरजी पाडवी (मांडवी आंबा) फुलजी पाडवी (कोंबरेज) रावजी सुरजी (सोमावल )मंगाबाई मायाजावर (बनेड्या मध्य प्रदेश) सावऱ्या भाई (मध्य प्रदेश सेंधवा) खंडू भाई (मध्य प्रदेश)शाकंभाई भिल (मध्य प्रदेश )इत्यादी जण मरण पावले.
निझरा नाल्याचे पाणी दोन दिवस पर्यंत रक्ताळलेले वाहत होते.गोळीबाराच्या ठिकाणी एक महिनाभर गिधाडांचे राज्य होते. नाल्याचा सपाट भागावर विसावलेल्या या नाल्याचा दोन्ही किनाऱ्यावरून उंच भागावरून गोळीबार करणारे गोरे आणि काळे सैनिक होते. गोळीबार एवढा अमानुष होता की ८० वर्षापूर्वी झालेल्या गोळीबाराच्या खुणा आजही दगडावर आहेत. तळोदा पोलीस ठाण्याला दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले ३०० पेक्षा जास्त आरोपी करण्यात आले.त्यात संत रामदास महाराज सहित ३० जणांना खानदेश मधून दोन वर्षासाठी हद्दपार केले. त्यात प्रामुख्याने मोरवड ,बोर्डेपाडा बोरद ,नवलपुर ,चिनोदे, सलसाडी, राणीपूर ,मोहिदा, छोटा धनपूर,कढेल, लाखापुर गावातील होते.
गुलाम महाराजांच्या उपक्रमातून होणारे परिवर्तन कोणत्याही मापदंडाने मोजण्यासारखे नव्हते.२९ जुलै १९३८ ला संत गुलाब महाराजांचे देहावसन झाले. त्यानंतर त्यांचे लहान बंधू रामदास महाराज यांनी आप समाजाची धुरा सांभाळली आप समाजाचा प्रभाव पाहण्यासाठी तात्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री खैर अबकारी माजी बिल्डर, जिल्हा अधिकारी वगैरे अनेक शासकीय मंडळी मोरवड येथे आले होते.२२ ऑगस्ट १९३८ रोजी झालेल्या आरती पूजन कार्यक्रमास सव्वा लाखाचा समुदाय उपस्थित होता. त्याची सरकारी दप्तरी नोंद आहे.
पश्चिम खानदेश चे तात्कालीन जिल्हाधिकारी आरती वर कलम ४६(१) अन्वये दिनांक १० जून १९४१ ला पहिली बंदी घालण्यात आली. संत रामदास महाराज व अनुयायांची या आदेशाला केराची टोपली दाखवली. २३ ऑक्टोबर १९३९ ला जावली गंठा स्टेट येथे खूप दंगल झाली. त्यावेळी अमानुष अत्याचार झाले. गोळीबार झाला, जाळपोळ झाली. दि. ३०ऑक्टोबर १९४१ ला तात्कालीन जिल्हाधिकारी मोरवड क्रिपो १४४ कलम लावून २३ एप्रिल १९४२ रोजी संत रामदास महाराज सह ३० अनुयायींना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.
आजही रावलापाणी येथे रस्ता नसताना आप परिवार व संत रामदास महाराज व संत गुलाब महाराज यांचे अनुयायी संत चंद्रसेन महाराज व जितेंद्र पाडवी यांच्या मार्गदर्शन खाली रावळापाणी येथे २ मार्च रोजी श्रद्धांजली देण्यासाठी जात असतात.सर्व आप समाज व आदिवासी समाज एकत्र येत असल्याने महाराष्ट्रात फक्त येथे शहिदांना श्रद्धांजली देण्याची प्रथा आहे. असे जुने भक्तगण सांगत असतात.या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील आप समाज व जितेंद्र महाराज व चंद्रसेन महाराज यांनी केले आहे.