म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाणे व सभोतालील परीसर जलयुक्त शिवार कार्यक्रम -२ व पाणलोट क्षेत्र कार्यक्रम अंतर्गत समाविष्ठ करावा यासाठी पंचायत समिती सदस्यसह परिसरातील सरपंचांनी नुकतेच नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,शहादा तालुक्यातील पूर्व भागातील मंदाणे गांव व परिसर हा अवर्षण प्रवण विभाग आहे.गेल्या दोन-तीन वर्षात पावसाच्या अनियमितपणाने भूजल पातळी खूप मोठ्या प्रमाणावर खालावलेली आहे.त्यात या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल अशी भीती आहे.सदर गंभीर स्वरूपाची दुष्काळी परिस्थिती पहाता वरील समस्या सोडविणे कामी मंदाणे गाव व परिसरातील तितरी,वाघर्डे,चिखली खुर्द,भोरटेक,ओझर्टा,जामपाडा, लहान जावदे तह,वडगांव,कोळपांढरी,शहाणा,लं गडी,गोटाळी,मलगांव,सटीपाणी,भुला ने,मानमोडे,दुधखेडा,भोंगरा,चां दसैली,घोडलेपाडा,कोंढावड,जयनगर आदी गांवे व परिसर जलयुक्त शिवार कार्यक्रम फेज-२, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम व माझी वसुंधरा कार्यक्रम योजनेत समाविष्ठ करावेत.
सदर गावे ही मोठ्या लोकवस्तीची असल्याने वरील योजनांमुळे तेथील नागरिकांचा पिण्याच्या पाणीसह सिंचणासाठी लागणाऱ्या पाण्याचा मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल.निवेदनावर मंदाणे गणातील पंचायत समिती सदस्या रोहिणी दिनेश पवार,मलगांव सरपंच अमित पाडवी,लंगडी सरपंच प्रीती निलेश सुळे,चांदसैली सरपंच मनीषा प्रशांत पटले,मलगाव सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाडवी,परिसरातील सरपंच, शेतकरी आदींच्या सह्या आहेत.सदरचे निवेदन नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक,शहादा तालुका उपविभागीय कृषी अधिकारी,प्रांत अधिकारी,तहसीलदार,मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता आदींना देण्यात आले.








