नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील मोगराणी येथे घराची जागा मोजमाप करण्याकरीता सिटी सर्व्हेच्या कर्मचार्यांना बोलविण्याचा रागातून चौघां ना मारहाण करण्यात आली. मारहाणीत तिघे जखमी असून याप्रकरणी १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील मोगराणी गावात घराची जागा मोजमाप करण्याकरीता सिटीसर्व्हेच्या कर्मचार्यांना बालमसिंग गावीत यांनी बोलविले. त्याचा राग आल्याने भरत कांदा गावीत यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून बालमसिंग गावीत तसेच त्यांचाभाऊ रमेश गावीत व त्यांची वहिनी जेरूनाबाई व पुतण्या यांना हाताने, लागडी डेंगार्याने, दगडाने मारहाण करून शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत बालमसिंग गावीत, रमेश महार्या गावीत, देवमन गावीत या तिघांना दुखापत झाली.
याप्रकरणी बालमसिंग महार्या गावीत यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात भरत कांदा गावीत, ध्रुपदाबाई भरत गावीत, हेमंत भरत गावीत, शेवंता भरत गावीत, दयावंत भरत गावीत, दिपक नानासिंग गावीत, यमुनाबाई नानसिंग गावीत, कांदा नणल्या गावीत, चिमा कांदा गावीत, प्रकाश जिर्या प्रधान, दिपेश जिर्या प्रधान, वंती जिर्या गावीत, सुमा ढेग्या गावीत सर्व रा.मोगराणी यांच्याविरूध्द भादंवि कलम १४३, १४७, १४८, ३३७, ३२३, ५०४, ५०६ सह महापोकाक ३७, (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार सुरेश चौरे करीत आहेत.








