म्हसावद l प्रतिनिधी
१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन सारंगखेडा येथे करण्यात आले होते उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा चेतक फेस्टिवल सारंगखेडा चे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते झाले .
स्पर्धेत शहादा नं १ ,शहादा नं २,प्रकाशा , वडाळी,म्हसावद ,ब्राम्हणपुरी,मंदाणा ,लोणखेडा अशा एकुण 8 बीटमधील जिल्हा परिषद शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. दि १७ फेब्रुवार ते १९फेब्रुवार दरम्यान सामने झाले. अंतिम सामना ब्राम्हणपुरी विरुद्ध म्हसावद असा झाला त्यामध्ये ब्राम्हणपुरी संघाने विजय मिळवला. उपविजेता संघ म्हसावद, तृतीय विजेता संघ मंदाणा तसेच उत्तेजनार्थ बक्षीस सारंगखेडा संघास मिळाले.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सामने पार पडले. प्रथम ट्राँफी ब्राम्हणपुरी संघास तर द्वितीय ट्रॉफी म्हसावद संघास चेतक फेस्टिवल सारंगखेडा चे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच सारंगखेडा परिक्षेत्राचे पी.एस.आय. भगवान कोळी यांच्या हस्ते मॅन आँफ दि मँच आणि मॅन आँफ दि सिरीज चा बहुमान अष्टपैलु खेळाडु भगवान लखवाल यांना मिळाला .तृतीय ट्राँफी मंदाणा संघास त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष गोपाल गावित,जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा मार्गदर्शक संजय गावित ,शहादा तालुका उपाध्यक्ष सुनिल चित्ते यांनी आयोजन, नियोजन करुन जबाबदारी स्वतः स्विकारली आणि स्पर्धा यशस्वी पार पाडल्या याबद्दल तालुकाध्यक्ष तुकाराम अलट तसेच सर्व पदाधिकारी यांनी कौतुक केले स्पर्धा यशस्वितेसाठी तालुक्याचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे ,गटशिक्षणाधिकारी डी.टि.वळवी विस्तार अधिकारी योगेश सावळे तसेच सर्व विस्तार अधिकारी आणि सर्व केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे आभार सुनिल चित्ते यांनी मानले.