अक्कलकुवा | प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अक्कलकुवा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अक्कलकुवा येथे प्रतिमा पूजन करण्यात आले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा कोयलीविहीर ग्रामपंचायतीचे सदस्य कान्हा नाईक, पृथ्वी सिंह पाडवी रवींद्र चौधरी शिवसेनेचे गोलू चौधरी, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक तथा ग्रामपंचायत सदस्य रोहित चौधरी,भिकमचंद चव्हाण, आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पमाला अर्पण केले. यावेळी कार्यकर्त्यांनी श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला.