शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण शिक्षण मंडळाकडून बारावीच्या फेब्रुवारी 2023 च्या वार्षिक परीक्षेस आज दि. 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. कला,विज्ञान व वाणिज्य शाखेतून एकूण 828 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत.
परीक्षा तणावमुक्त व कॉपी विरहित वातावरणात संपन्न होणार आहेत .विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महाविद्यालयाच्या वाङ्मयभवनात परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचा सूचना फलक लावण्यात आला असून केंद्र क्रमांक 625 लोणखेडा येथील केंद्रात कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतून एकूण 828 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहेत, अशी माहिती केंद्र संचालक उपप्राचार्य कल्पना पटेल व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी दिली आहे.