Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
February 20, 2023
in राजकीय
0
जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार l प्रतिनिधी
येत्या दोन वर्षांत जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
नंदुरबार येथे आमदार निधी व नगरविकास निधीतून विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, लोकप्रतिनिधी सर्वश्री विजय चौधरी, हिरा उद्योग समुहाचे डॉ.रविंद्र चौधरी, विक्रांत मोरे, बांधकाम विभागाचे उप अभियंता बालाजी कांबळे, सहाय्यक अभियंता अभिजीत वळवी, यांच्यासह लोकप्रतिनीधी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, जिल्ह्यासह सर्व तालुक्यातील नवीन रस्ते तयार करण्यासाठी सर्व्हे करण्यात आला असून यासाठी 4 हजार कोटींची निधी लागणार आहे. या नविन रस्त्यासाठी यावर्षी 2 हजार कोटीची तरतूद केली असून पुढच्या वर्षी 2 हजार कोटी रुपयांची तरतुद केली असून येत्या दोन वर्षांत कुठल्याही व्यक्तिंना कुठल्याही पाड्या व वस्त्यांमध्ये जाण्यासाठी बारमाही जाण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रस्ते चांगले होतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असून जिल्ह्यांचे 100 टक्के सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी उपसा सिंचन व पाटचारीद्वारे तापीचे पाणी आणण्यासाठी नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिवेशनकाळात बैठक घेण्यात येणार असून यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधी आदिवासी विकास विभागातून उपलब्ध करुन देण्यात येईल. तरुणांना रोजगार देण्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील तरुणांना, महिलांना स्वंयरोजगारासाठी प्रशिक्षण देवून त्यांना विविध योजनांच्या माध्यामातून लाभ देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते व इतर नागरी विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
खासदार डॉ.गावीत म्हणाल्या की, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.गावित यांच्या प्रयत्नांनी नगर विकास विभागाच्या माध्यमातून व आमदार स्थांनिक विकास निधीतून या परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी मंजूर केला असून माळी समाजाच्या मंगल कार्यालय निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
या विकास कामाचे झाले भूमिपूजन  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधीतून 40 लक्ष तसेच नगरविकास विभागाच्या निधीतून नंदुरबार नगर परिषद अंतर्गत प्रमाग क्र.14 व 18 मधील योगेश्वरी माता मंदीर जवळ सामाजिक सभागृह तयार करणे. गटार व पेव्हर बॉल्क बसविणे, योगेश्वरी माता मंदिरामागे संरक्षण भिंत बांधणे,गटार ड्रेनेज, जॉगिग ट्रॅक, विद्युत पोल बसविणे,रस्ते इत्यादी कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
बातमी शेअर करा
Previous Post

तरुणाई उतरली रस्त्यावर : लेझर शोमध्ये आकर्षक विद्युत रोशनईच्या झगमगाटात शिवरायांच्या पुतळा उजळला

Next Post

तोरणमाळ येथील श्री.गोरक्षनाथ महाराज यात्रेत दुसऱ्या दिवशीही हजारो भाविक दाखल

Next Post
तोरणमाळ येथील श्री.गोरक्षनाथ महाराज यात्रेत दुसऱ्या दिवशीही हजारो भाविक दाखल

तोरणमाळ येथील श्री.गोरक्षनाथ महाराज यात्रेत दुसऱ्या दिवशीही हजारो भाविक दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add