नंदूरबार l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील म्हसावद येथे आज दि
19 फेब्रुवारी दुपारी १२.५४ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले भूकंपाची २.८ रिश्टर स्केल एवढी नोंद करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश राज्यातील बडवानी येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.









