Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

team by team
February 19, 2023
in क्राईम
0
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी

 

दोंडाईचा रस्त्यावरील रनाळे गावाजवळ वाहनाने धडक दिल्याने १३ वर्षीय मुलगा, शहादा-डोंगरगाव रस्त्यावर दुचाकींच्या अपघातात एक तसेच शहादा तालुक्यातील बहिरपूर ते मुबारकपूर येथे दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एक असे तीन जणांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.

 

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील प्रकाश निंबा काकडे हे दुचाकीवर (क्र.एम.एच.१८ एई ३८९९) रोहित नरेंद्र मिस्तरी (वय १३) यास बसवून रनाळे गावाकडे घरी जात होते. यावेळी नंदुरबारकडून येणारी सुदाम सुकदेव नरोटे रा.गुम्मी ता.बुलढाणा याने त्याच्या ताब्यातील मालट्रक (क्र.एम.एच.२१ बीएच ७८६२) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रक चालवून दुचाकीला धडक दिल्याने रोहित मिस्तरी खाली पडल्याने त्याच्या अंगावरुन ट्रक चालविल्याने रोहित याचा मृत्यू झाला. तसेच प्रकाश काकडे यांना दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले.

 

 

 

याबाबत नरेंद्र वसंत मिस्तरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात सुदाम नरोटे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.देविदास नाईक करीत आहेत. तर शहादा तालुक्यातील वडछील येथील वासुदेव अशोक पाटील (वय ४३) हे दुचाकीने (क्र.एम.एच. ३९ के ३४१६) वडछीलकडून डोंगरगाव रस्त्याने शहादा येथे जात होते. यावेळी एका दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एके ११४७) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वासुदेव पाटील यांच्या दुचाकीला धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले. याबाबत कल्पेश दिलीप पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.तारसिंग वळवी करीत आहेत.

 

 

दरम्यान शहादा तालुक्यातील बहिरपूर येथील संजय जयराम पवार (वय ४०) हे दुचाकीने (क्र.एम.एच.३९ एच ५८४२) बहिरपूर ते मुबारकपूर रस्त्याने जात होते. यावेळी शहादा तालुक्यातील बिलाडी येथील भरत पानीलाल पवार याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे.१५ एए १२५) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून धडक दिल्याने संजय पवार यांना दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत सुहास जयराम पवार यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात भरत पवार याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जितेंद्र पाडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तोरणमाळ येथील गोरक्षनाथ तीर्थक्षेत्राला यात्रेनिमित्त हजारो भक्तांची घेतले दर्शन

Next Post

कोठली येथे रस्ता कॉक्रीटीकरण कामाचे खा. डॉ.हीना गावीत यांच्या हस्ते भुमीपुजन

Next Post
कोठली येथे रस्ता कॉक्रीटीकरण कामाचे खा. डॉ.हीना गावीत यांच्या हस्ते भुमीपुजन

कोठली येथे रस्ता कॉक्रीटीकरण कामाचे खा. डॉ.हीना गावीत यांच्या हस्ते भुमीपुजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add