म्हसावद l प्रतिनिधी
तोरणमाळ येथील प्रसिद्ध असलेले श्री. गोरक्षनाथ महाराज यांच्या यात्रेला महाशिवरात्री पासून सुरूवात झाली असून या दिवशी श्री गोरक्षनाथ महाराज यांचे हजारो भाविकांची दर्शन घेतले.

महाराष्ट्र राज्याच्या क्र. दोन चे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ हे पर्यटक स्थळ असले तरी ते श्री.गोरक्षनाथ यांच्या यात्रा उत्सवासाठी ही तिन्ही राज्यात प्रसिद्ध आहे. दर वर्षाच्या येणाऱ्या महाशिवरात्री निमित्त याठिकाणी श्री. गोरक्षनाथ महाराज यांची मोठी यात्रा भरते यासाठी तीन राज्यातून भक्तगन याठिकाणी दोन तीन दिवस रात्र मुक्कामासाठी येतात महाशिवरात्री च्या दिवशी परिसरातील पोलीस पाटील,गाव पुजारी व गावकरी व भक्तगन डोक्याला पगडी बांधून पारंपरिक वेशभूषा परिधान करून श्री. गोरक्षनाथ महाराज यांची पालखीची गावातून मिरवणूक काढतात व पालखीस मंदिरात ठेवतात. लांबलचक रांगेत लागून दर्शनसाठी आलेले भाविक तांब्यात पाणी आणत श्री. गोरक्षणात महाराज यांच्या लहान मूर्तीवर अभीषेक करतातं व नारळ न वटवता त्याठिकाणी ठेवतात व सोबत आणलेले पीठ स्वयंसेवक यांच्याकडे जमा करतात व त्या गोळा झालेल्या पिठात सुकामेवा व तूप टाकून त्याचा सवा मन चा रोट तयार केला जाणार आहे.

व त्यास सायंकाळी आरती झाल्यानंतर भाजला जातो व तो झाल्यावर रात्र जागरण केलेल्या व जमलेल्या भावीकांना प्रसादाच्या स्वरूपात वाटप केले जाणार या वेळी नंदुरबार जिल्हा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार,शहादा चे सपोनि संदीप आरव,धडगाव चे उपनिरीक्षक महाले यांच्यासह ६१ पोलीस कर्मचारी व ४१ होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलाची पथक, स्वानपथक ,बिनतारी संदेश विभाग यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेला आहे.तसेच वनक्षेत्रपाल मशेस चव्हाण, वनपाल संजय पवार,वन कर्मचारी, धडगावचे नायब तहसीलदार धडगाव पी.एम. पानपाटील, मंडळ अधिकारी एस.एस. वळवी आदी उपस्थित होते.









