Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चोरीस गेलेली ॲपेरिक्षा व संशयित आरोपीस 12 तासाच्या आत नंदूरबार शहर पोलीसानी केले जेरबंद

team by team
February 18, 2023
in क्राईम
0
चोरीस गेलेली ॲपेरिक्षा व संशयित आरोपीस 12 तासाच्या आत नंदूरबार शहर पोलीसानी केले जेरबंद

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेली ॲपेरिक्षा व संशयित आरोपीस 12 तासाचे आत जेरबंद करण्यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.

 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रमेश मगन कुवर रा. दरीपाड़ा पोस्ट आमरपाटा, ता. साक्री, जि. धुळे हे जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे उपचारासाठी आले असता त्यांनी त्यांच्या मालकीची 50 हजार रुपये किंमतीची रिक्षा (क्र.जी.जे. 19-0293) ही जिल्हा रुग्णालयाचे गेट समोर पार्क करुन ठेवली होती. सदरची ॲपेरिक्षा ही दि.14 फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या गेट समोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली म्हणुन 17 फेब्रुवारी रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी आले असता त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

 

 

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या आदेशान्वये नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेल्या ॲपेरिक्षाबाबत गुन्हे शोध पथकाशी चर्चा केली. तसेच चोरीस गेलेल्या ॲपेरिक्षाच्या शोधासाठी 2 पथके तयार केली.

 

 

 

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना एक इसम हा चोरीची रिक्षा नंदुरबार शहरालगत असलेल्या पातोंडा ते होळ रस्त्यालगत फिरत असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सांगीतल्याने त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना तात्काळ मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी रवाना करुन सदर इसमाचा शोध घेण्यास सांगीतले. गुन्हे शोध पथकाने पातोंडा ते होळ रस्त्या दरम्यानच्या सापळा रचला असता संशयीत आरोपी हा एका अँपेरीक्षासह येत असतांना दिसुन आला. पोलीस पथकाने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता  संशयीत आरोपी हा ॲपेरिक्षासह पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने विजय जयंता वळवी, , रा.खडकी, ता. अक्कलकुआ यास अटक केली.

 

 

 

त्याच्याकडील ॲपेरिक्षा ही त्याने नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालयाचे गेट समोरुन चोरी केल्याची माहिती दिली. त्याच्याकडील 50 हजाराची ॲपेरिक्षा ( क्र.जी.जे.- 19-0293) ही कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केली.
सदरची कारवाई ही नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांक्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोहेकॉ संदिप गोसावी, पोना नरेंद्र पाटील, पोना स्वप्निल पगारे, पो. शि. विजय नागोडे, पोशि युवराज राठोड, पोशि योगेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात शिवजयंती निमित्त उद्या आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे भव्य लेझर शो

Next Post

नाल्यात आढळला बिबट मृत अवस्थेत

Next Post
नाल्यात आढळला बिबट मृत अवस्थेत

नाल्यात आढळला बिबट मृत अवस्थेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add