Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सीहोर येथे रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी, एका महिलेचा मृत्यू, 3 महिला भाविक बेपत्ता

team by team
February 16, 2023
in राज्य
0
सीहोर येथे रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी,  एका महिलेचा मृत्यू, 3 महिला भाविक बेपत्ता

नंदूरबार l प्रतिनिधी

मध्य प्रदेश राज्यातील सीहोर येथे आयोजीत करण्यात आलेल्या शिवमहाकथापुराण महोत्सवाला प्रचंड गर्दी झाली असून रुद्राक्ष महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाल्याने मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील एका महिलेचा मृत्यू झाला. तर बुलढाणा जिल्ह्यातील 3 महिला बेपत्ता झाल्या आहे. सीहोरला जाणार्‍या भाविकांनी नियोजन करुनच घराबाहेर पडावे असे आवाहन मध्य प्रदेश प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सिहोर येथे जवळपास 20 लाख लोक जमल्याचा अंदाज आहे. भाविकांची मोठी गर्दी पाहून पंडित प्रदीप मिश्रा यांनी बुधवारी रुद्राक्षांचे वितरण सुरु केले होते. समितीने 20 काउंटर्सच्या मदतीने भाविकांना रुद्राक्ष वाटले. बुधवारी सायंकाळपर्यंत जवळपास दीड लाख रुद्राक्षांचे वाटप झाले.
आज गुरुवार रोजी रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाल्याने मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील मंगलाबाई कांडेकर यांचे निधन झाले.तर बुलढाण्याच्या एका महिलेसह 3 महिला भाविक बेपत्ता झाल्या आहेत.

प्रचंड गर्दी झाल्याने अनेकांना रुद्राक्ष न मिळाल्याने लोकांनी पंडित प्रदीप मिश्रांविरोधात नाराजी व्यक्त करत घोषणा दिल्या.

दरम्यान या महोत्सवाला मध्य प्रदेश व महाराष्ट्रासह, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, गुजरात आदी देशाच्या विविध राज्यातून भाविक येत आहेत. बुधवारी कुबेरेश्वर धाम महादेवाच्या दर्शनासाठी 2 किमी लांब रांग लागली होती.गुरुवारी सकाळची कुबेरेश्वर धाम ते इछावर रोडपर्यंत 17 किमी लांबीचा जाम होता. सीहोर ते इंदूरच्या दिशेने 27 किमी व भोपाळच्या दिशेने 10 किमी लांबीच्या महामार्गावरही जाम होता.

गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कवरही ताण आला होता. पोलिस व प्रशासनाच्या टीम व्यतिरिक्त आरएसएस, बजरंग दल, स्थानिक लोक, समिती सदस्य असे एकूण 15,000 लोक व्यवस्था सांभाळत आहेत. कथा पंडाल, अन्न पंडाल, रुद्राक्ष वितरण केंद्र येथे त्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जी.टी.पाटील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Next Post

महाराष्ट्रातील ११ कलाकारांना ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान

Next Post
महाराष्ट्रातील ११ कलाकारांना ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान

महाराष्ट्रातील ११ कलाकारांना ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add