Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकरी व सैनिकांचे प्रश्न सोडवनिण्यासाठी राष्ट्रवादी माजी सैनिक सेलतर्फे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन : प्रदेशाध्यक्ष दिपक शिर्के

team by team
February 16, 2023
in राजकीय
0
शेतकरी व सैनिकांचे प्रश्न सोडवनिण्यासाठी  राष्ट्रवादी माजी सैनिक सेलतर्फे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन : प्रदेशाध्यक्ष दिपक शिर्के

नंदुरबार | प्रतिनिधी

राज्यातील ३६ जिल्हे व १५० तालुक्यांमध्ये शाहू फुले व आंबेडकरांचे विचारांचा प्रसार,प्रचार करीत ९ लाख ५० हजार सैनिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच सदस्य नोंदणी करण्यासाठी राष्ट्रवादी माजी सैनिक सेलतर्फे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक शिर्के यांनी दिली.

नंदुरबार येथे राष्ट्रवादी माजी सैनिक सेलतर्फे महाप्रबोधन यात्रा नंदुरबार येथे आली असता. पत्रकारांशी संवाद साधतांना श्री.शिर्के बोलत होते. ते पुढे म्हणाले की,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर वर्ष सुरू असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ३६ जिल्हे व १५० तालुक्यांमध्ये शाहू फुले व आंबेडकरांची विचारधारा पोहचविण्यासाठी तसेच महापुरूषांचे विचार तळागळात पोहोचविण्यासाठी महाप्रबोधनयात्रेला दि.१० फेब्रुवारी रोजी पुणे येथे सुरूवात झाली ती आज नंदुरबार येथे पोहोचली आहे.

या यात्रेनिमित्त राज्यात भाजपातर्फे शेतकर्‍यांचे च सैनिकांचे कैवारी आम्हीच आहोत, असे बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व नागरीकांची दिशाभूल करण्यात येत आहे. मात्र शरदचंद्र पवार यांनीच शेतकरी व सैनिकांसाठी काम केलेले आहे. दरम्यान राज्यात ९ लाख ५० हजार माजी सैनिक असून त्यांचे प्रश्‍न, समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे माजी सैनिक सेलची स्थापना करण्यात आली आहे. माजी सैनिक सेलतर्फे राज्यभर महाप्रबोधनयात्रा काढण्यात येत आहे. यामध्ये महापुरूषांची बदनामीला आळा घालण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासोबत माजी सैनिकांची सदस्य नोंदणीही करण्यात येत आहे. यावेळी विरसैनिक, युध्दवीर, वीर माता पिता, वीर पत्नी यांचा सत्कार करण्यात येत आहे. दि.९ एप्रिल रोजी पुणे येथे महाप्रबोधन यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.

या प्रबोधन यात्रेतून महापुरूषांचे विचार तळागापर्यंत पोहचविण्यात येत असून लोकशाही मजबूतीसाठी राष्ट्रवादीला स्वबळावर एकहाती सत्तेसाठी प्रयत्न करीत असल्याचे माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक शिर्के यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अभ्यासक संभाजीराव मोहिते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जि.प.सदस्य मोहन शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

ए यार सुन यारी तेरी, मुझे जिंदगी से भी प्यारी है, दोन जिगरी मित्रांची २४ तासात अनोखी एक्झिट

Next Post

जी.टी.पाटील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Next Post
जी.टी.पाटील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

जी.टी.पाटील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add