नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील वे.खा.भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित कमला नेहरू कन्या कनिष्ठ महाविद्यालय,नंदुरबार येथील विद्यार्थिनी प्राजक्ता दादाभाई इंदवे ह्या विद्यार्थीनीने कल्चरल फाऊंडेशन, नंदुरबार व्दारा आयोजित नगराध्यक्षा करंडक देशभक्ती व लोकनृत्य स्पर्धेत बँडमिंटनपटू सायना नेहवाल यांचा जिवनावर आधारित नृत्य सादर करत यश प्राप्त केले.
यशस्वी विद्यार्थिनीला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती.स्मिता अजमेरा व प्राचार्या सौ.वंदना पाटील, उपप्राचार्य.बी.सी पवार, उपमुख्याध्यापक एस.एम.पाटील, पर्यवेक्षक .डी.पी राजपुत व एस.एन.चौधरी यांनी विद्यार्थिनीचे कौतुक व अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.यशस्वी विद्यार्थीनीला क्रीडा शिक्षक प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.








