नंदुरबार | प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार व्दारा आयोजित व नंदुरबार जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशन, नंदुरबार यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.१३ ते १५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील आठ विभागातुन सुमारे ३३६ खेळाडु व संघ व्यवस्थापक सहभागी झालेले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारार्थी संजय होळकर, बळवंत निकुंभ, महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनचे सचिव अनिल वरपे, उपाध्यक्ष पंकज पाठक, नंदुरबार तालुका क्रीडा संयोजक मिनल वळवी हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून अमोद भिडे (सांगली), सुमित वाघमारे (मुंबई), अमोल चित्ते (नंदुरबार), चेतन जव्हेरी (नंदुरबार) सिध्दार्थ अंबरे (नाशिक), कृष्णा ठाकरे (नागपूर), भारत पैय्याऊल (अहमदनगर), राजेश्वर चौधरी (नंदुरबार), जयेश जेठे (नंदुरबार), अभिजित देशमुख (औरंगाबाद), राकेश चौधरी (नंदुरबार), रामकृष्ण खडके (उस्मानाबाद) यांनी काम पाहिले. उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.डॉ.मयुर ठाकरे यांनी केले. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी तालुका क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, मुकेश बारी, कविता राठोड. कल्पेश बोरसे यांनी काम पाहिले.
सेमी फायनलमध्ये दाखल विभाग
१४ वर्ष आतील मुले-अमरावीत विभाग, कोल्हापूर विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग. १४ वर्ष मुली-औरंगाबाद विभाग, पुणे विभाग, लातूर विभाग, नाशिक विभाग. १७ वर्ष आतील मुले-लातूर विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक विभाग, अमरावती विभाग, १७ वर्ष आतील मुली-नागपूर विभाग, अमरावती विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग. १९ वर्ष आतील मुले-नाशिक विभाग, कोल्हापूर विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग. १९ वर्ष आतील मुली-नागपूर विभाग, लातूर विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग.








