नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा विज्ञान प्रदर्शनात श्रॉफ हायस्कूलच्या चि.प्रणील जितेंद्र भावसार या विद्यार्थ्याच्या ‘ग्रीन एनर्जी वायरलेस चार्जिंग स्टेशन’ या उपकरणास उच्च प्राथमिक गटातून प्रथम तर नवापूरच्या शिवाजी हायस्कूलचा यामीन खान युनूस खान पठाण या विद्यार्थ्याच्या ‘कवच इंडियन आर्मी प्रोटेक्शन’ या उपकरणाला माध्यमिक विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
जि.प.अध्यक्षा कु.सुप्रिया गावित व जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये नंदुरबार जिल्हा विज्ञान प्रदर्शन माध्यमिक शिक्षण विभाग, मुख्याध्यापक संघ व श्रॉफ हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचा समारोप विजेत्या बाल वैज्ञानिकांना पारितोषिक वितरणाने झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, प्रकल्प अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आर.बी.पाटील, मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
जि.प.अध्यक्षा सुप्रिया गावित यांनी या विज्ञान प्रदर्शनातून उपयुक्त ठरलेल्या दोन उपक्रम उपकरणांना जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी उपयोगात आणणार असल्याचे जाहीर केले.
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी विद्यार्थ्यांना सर्जनशील विचार करण्याचे आवाहन केले. विज्ञानाव्यतिरिक्त इतरही अनेक क्षेत्रात नवीन कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या उपक्रमांना महाराष्ट्र कौशल्य विकास मंडळाच्या पोर्टलवर सादर करण्याचे त्यांनी आवाहन केले.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक घडावे म्हणून नाविन्यपूर्ण कल्पना वाढवण्याचे आवाहन केले. परीक्षकांमधून संजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी अहवाल वाचन केले. परीक्षक संजय शिंदे, प्रा.डॉ.नानासाहेब भुसे, डॉ.संजय पाटील, गोपाळ महाजन, मिलिंद वडनगरे, डॉ.संध्या पटेल आदींचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचलन सौ.चेतना पाटील यांनी यांनी केले. अतिथी परिचय प्रा.प्रशांत बागुल यांनी केला. बक्षीस विजेत्यांची नामावली विज्ञान निरीक्षक आर.बी.पाटील यांनी जाहीर केली. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी श्री.धनगर, आर.डी.बच्छाव, जितेंद्र पाटील, उपमुख्य उपमुख्याध्यापक राजेश शहा, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकार्यांनी परिश्रम घेतले.
पारितोषिकप्राप्त बाल वैज्ञानिक व मार्गदर्शक शिक्षक असे
उच्च माध्यमिक गट- प्रणिल जितेंद्र भावसार (ग्रीन एनर्जी चार्जिंग स्टेशन, श्रॉफ हायस्कूल, मार्गदर्शक सौ.चेतना पाटील- प्रथम क्रमांक), विवेक बन्सीलाल पाटील (पुतळाबाई पाटील विद्यालय वैंदाणे, उपकरण-बहुउद्देशीय शिडी, मार्गदर्शक ए.एस.खाटीक-द्वितीय), योगिनी सुनील परदेशी (नेम सुशील विद्या मंदिर, उपकरण – आमच्यासाठी गणित, मार्गदर्शक श्रीमती अश्विनी भोपे-तृतीय)
आदिवासी राखीव गट
जोसेफ फिलिप नाईक (आधुनिक माध्यमिक शाळा सोनखांब, बी.एस.सॅटेलाइट, मार्गदर्शक योगेश रोहिदास खरडे)
उच्च माध्यमिक गट – प्रथम- यामीन खान युनूस खान पठाण (शिवाजी हायस्कूल कवच इंडियन आर्मी प्रोटेक्शन, मार्गदर्शक-श्रीमती जी.बी.कलाल), द्वितीय- (धीरज नारायण नांदुरकर डी.आर.हायस्कूल, इको फ्रेंडली गार्बेज इलेक्ट्रिसिटी जनरेशन, मार्गदर्शक- श्रीमती डी.एस.परदेशी), तृतीय-(शंकर गोकुळ शिंदे, अनुदानित माध्यमिक विद्यालय सोनखांब, रेल्वे स्थानकावरील जीवन संरक्षक, मार्गदर्शक- शिक्षक मनोहर वाल्हे)
आदिवासी राखीव गट – शकुंतला जयंतीलाल वसावे (सार्वजनिक हायस्कूल विसरवाडी, बोअर वेलमध्ये पडलेल्या बाळाला बाहेर काढण्याचे यंत्र, मार्गदर्शक- के.के. कढरे)
शैक्षणिक साहित्य निर्मिती गट – प्राथमिक गट-श्रीमती अलका अशोक पाटील (जि.प.शाळा मोगरा तालुका अक्कलकुवा, उपकरण- मायक्रो लॅब), माध्यमिक गट – चेतन रमेश पाटील (सातपुडा वैभव विद्यालय वाण्याविहिर, खेळातून विज्ञानाकडे)
प्रयोगशाळा सहाय्यक गट- कैलास भगवान नांद्रे (अनुदानित आश्रम शाळा कोचरा, क्रिएटिव्हिटी इन सायन्स)








