Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे बडगुजर समाजाचा स्नेह मेळावा उत्साहात

समाजाचे उत्थान करायचे असेल तर अनिष्ट चालीरिती बदलूया-दिलीप बडगुजर

team by team
February 14, 2023
in सामाजिक
0
नंदुरबार येथे बडगुजर समाजाचा स्नेह मेळावा उत्साहात

नंदूरबार l प्रतिनिधी

 

बडगुजर समाजाने उन्नतीचा मार्ग स्विकारला आहे. समाजातील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. समाजाचे उत्थान करायचे असेल तर समाजातील अनिष्ट चालीरिती, प्रथा-परंपरा बदलल्या पाहिजे. त्यासाठी नव्या पायंड्याला सुरुवात करण्याचे आवाहन बडगुजर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक दिलीप बडगुजर यांनी केले. ते येथील बडगुजर समाजाच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी बोलत होते.

 

 

 

येथील नगर पालिकेच्या शहीद शिरीषकुमार मेहता शाळेच्या सभागृहात रविवारी बडगुजर समाजाचा स्नेह मेळावा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात समाजातील ज्येष्ठ नागरीक भालचंद्र बडगुजर, पांडुरंग बडगुजर, श्रीमती कमलाबाई बडगुजर, श्रीमती सुशिलाबाई बडगुजर यांच्या हस्ते चामुंडा मातेच्या प्रतिमा पुजनाने झाली. यानंतर माहिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. यावेळी समाजातील बडगुजर समाज महिला मंडळाच्या सदस्यांनी हळदी-कुंकू करुन वाण वाटप केले. यानंतर बाळगोपाळांपासून तर दाम्पत्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात समाज बांधवांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

 

 

समाजातील विविध क्षेत्रात यश निवड, पदोन्नती तसेच प्राविण्यप्राप्त विजय बडगुजर, महेंद्र बडगुजर, आदित्य बडगुजर, साईराज बडगुजर, मोहन बडगुजर, सुरेश बडगुजर आणि उर्वशी बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकेत मंडळाचे अध्यक्ष दिलीप बडगुजर पुढे म्हणाले की, समाजात कुणाचा मृत्यू झाल्यास पहिल्या दिवशी व गंध मुक्तीच्या कार्यक्रमात समाजबांधव हजेरी लावतात. मात्र त्या परिवाराला प्रत्येक दिवशी समाजाच्या सहानुभुतीची गरज असते. म्हणून रोज अशा व्यक्तीच्या घरी जावून समाजबांधवांनी त्यांचे सांत्वन करावे, विधवा महिलांना हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी आमंत्रित करून त्यांच्यातील न्यूनगंड घालवण्यात येईल. त्यांना बरोबरीचा सन्मान देण्यात येईल, केंद्रात बडगुजर समाजाला ओबीसींमध्ये समावेशासाठी राज्यातील खासदारांचे पत्र लिहून ते केंद्राकडे पाठवण्यात येणार असून या चळवळीची सुरुवात नंदुरबारपासून करण्यात येईल, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

 

या ठरावाचे सर्व समाजबांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. मंडळाचे सल्लागार पंडीत बडगुजर, पांडुरंग बडगुजर, सौ.सुनिता बडगुजर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय बडगुजर यांनी तर आभार मोनिका बडगुजर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश बडगुजर, देविदास बडगुजर, अश्‍विन बडगुजर, दिनेश बडगुजर, गणेश बडगुजर, भरत बडगुजर, रवींद्र बडगुजर, अनिल बडगुजर, गिरीष बडगुजर, प्रविण बडगुजर, घनश्याम बडगुजर, शरद बडगुजर, किशोर बडगुजर, योगेश बडगुजर, पौर्णिमा बडगुजर, पुनम बडगुजर, अनिता भटू बडगुजर, अनिता विजय बडगुजर, प्रिती बडगुजर, वैशाली बडगुजर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सुमारे ५५० समाजबांधवांची उपस्थिती होती. त्यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होती. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
विजयी स्पर्धकांचा गौरव
पहिली ते चौथीच्या गटात मंथन प्रकाश बडगुजर, हंसराज प्रिती बडगुजर, कृष्णा कैलास बडगुजर, देविका प्रशांत बडगुजर, पाचवी ते आठवीच्या गटात दर्शन महेंद्र बडगुजर, साहिल शानाभाऊ बडगुजर, धीरज रवींद्र बडगुजर, किंजल राहुल बडगुजर तसेच नववी ते बारावीच्या गटात पायल सतीश बडगुजर, जयश्री रवींद्र बडगुजर, देव्यानी रतन बडगुजर, प्रियंका रवींद्र बडगुजर आदींना गौरवण्यात आले. महिला गटात सुनिता पंकज बडगुजर, सुनिता मनोज बडगुजर, संगिता आबा बडगुजर, पुनम किरण बडगुजर  तसेच दाम्पत्यांच्या गटात सुनीता पंकज बडगुजर, शुभांग दिलीप बडगुुजर, सुनीता मनोज बडगुजर, संगीता आबा बडगुजर, पूनम किरण बडगुजर आदींनी सहभाग नोंदवून विजय प्राप्त केला.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय क्रिडास्पर्धेत ढोंगसागाळी आश्रमशाळेच्या विद्याथ्यांचे यश

Next Post

साहित्य अभिवाचन स्पर्धेत अभिव्यक्तीची मृगया प्रथम

Next Post
साहित्य अभिवाचन स्पर्धेत अभिव्यक्तीची मृगया प्रथम

साहित्य अभिवाचन स्पर्धेत अभिव्यक्तीची मृगया प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add