नंदूरबार l प्रतिनिधी
– शालेय जीवनात विविध प्रायोगिक संकल्पना राबवताना चुका होणारच. त्या चुका होणे खूप अपेक्षित आहेत. मात्र तेथूनच आत्मविश्वासाचा व प्राविण्याचा मार्ग सापडत असतो,असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन समारोहात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

माध्यमिक शिक्षण विभाग नंदुरबार,जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ तसेच श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे जि.प. अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन समारंभाला जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, शिक्षण सभापती गणेश पराडके, कृषी सभापती श्रीमती हेमलता शितोळे, जि. प. सदस्य देवमन पवार, संस्थेचे सचिव डॉ. योगेश देसाई, मनीष शाह, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, सतीश चौधरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, उपशिक्षणाधिकारी आर बी पाटील,डॉ. युनूस पठाण,सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक रविंद्र पाटील, मुकेश पाटील,गणेश सोनवणे,विषय तज्ञ चंद्रकांत पाटील, मुख्याध्यापक सौ.सुषमा शाह उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन यांत्रिक दीप प्रज्वलन व यांत्रिक माल्यार्पण यंत्राद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी जिल्हा विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाचे महत्त्व प्रकट केले.कोरोना काळात घेतलेल्या ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय पातळीपर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील बाल वैज्ञानिक गेल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विज्ञान गीत व स्वागत गीत सौ अनघा जोशी यांच्या चमुने सादर केले.
सूत्रसंचालन प्रा. गणेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्रॉफ हायस्कूलच्या मुख्याध्यापक सुषमा शाह यांनी केले. यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक राजेश शाह,पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, मिलिंद वडनगरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकार्यांनी परिश्रम घेतले.
माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, वाहतूक आणि नवोपक्रम, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आमच्यासाठी गणित, वर्तमान नवोपक्रमासह विकास, आरोग्य व स्वच्छता या विषयांवर आधारित जिल्हाभरातून एकूण ४७ उपकरण सहभागी झाले आहेत.त्यात उच्च प्राथमिक विभागातील १३, उच्च माध्यमिक विभागातील १४, अनुसूचित जमाती गटातील सात व शिक्षक- प्रयोगशाळा सहाय्यक गटातून १३ आहेत.








