नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील अपंगांच्या जलगतीने विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना व सवलती सुरु केल्या आहे.परंतु स्थानिक अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारमुळे अपंग योजना व सवलती पासुन वंचित राहत आहे.त्यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शेख अनिस यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आनंद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये अपंग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सहायक आयुक्त श्री.शेडके व निरीक्षक प्रशांत गायकवाड सह आंदोलनकर्ते पदाधिकारी याची बाहेर येऊन भेट घेतली व कार्यालयात बोलावून मागण्यावर सविस्तर चर्चा केली व लवकरात लवकर मागण्या राज्य शासनाला पाठविण्याचे आश्वासनामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख जाकीर शेख, कुसुम सुकासे,राजीक शाह, अकील शेख ,प्रदेश अध्यक्ष आनंद पाटील व राज्य उपाध्यक्ष प्रतिक्षा वसावे ,नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मंगेश सोनवणे, जिल्हा संपर्कप्रमुख अर्जुन पाडवी ,उपजिल्हाप्रमुख शमींना पिंजारी, प्रेमराज वळवी,सचिन जाधव ,मयूर पाटील, रमेश मोहिते, भाऊसाहेब दसपुते, कलीम शेख,पुषा नाईक,अनिता शेठ,रीना पाटील ,लक्ष्मण वाघे, राजू चव्हाण,सलीम शेख, डि.कुमार जाधव, मयुर मेश्राम, दीपक जाधव, कुणाल झाल्टे, शंकर लढे,राहुल वानखडे, करामत शाह, व तसेच महाराष्ट्रातील दोनशे दिव्यांग बांधव उपस्थित होते.








