नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील इंद्रीहट्टी शिवारात असलेल्या सुजलॉनच्या टॉवरच्या ट्रान्सफार्मरमधून ऑईल चोरी केल्याने चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील इंद्रीहट्टी गावाच्या शिवारात सुजलॉन कंपनीचे के. ३६५ जवळ टॉवर आहे. सदर टॉवरच्या ट्रान्सफार्मरमधून दादाभाई राजेंद्र पाटील, समाधान जगन राजपूत, सोपान भगवान राजपूत व रावसाहेब पिल्लू धनगर सर्व रा.तिलाली ता.नंदुरबार यांनी ६ हजार रुपये किंमतीचे १०० लिटर ऑईल चोरुन नेले.
याबाबत सुपरवायझर सुरेश वामन ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सामुद्रे करीत आहेत.








