Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराविमं अधिकारी संघटनेचे ४५ वे राज्यव्यापी अधिवेशन शनिवारी अमरावतीत

team by team
February 11, 2023
in राज्य
0
मराविमं अधिकारी संघटनेचे ४५ वे राज्यव्यापी अधिवेशन शनिवारी अमरावतीत
नंदुरबार l
 मराराष्ट्र विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४५ वे राज्यव्यापी अधिवेशन शनिवार व रविवार दि. ११ व १२ फेब्रुवारीला अमरावती येथील हॉटेल प्राईम पार्क येथे आयोजित केले असून, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या अधिवेशनास महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सुत्रधारी कंपनीतील वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी उपस्थित रहाणार आहे.

 विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे (भाप्रसे) यांच्याहस्ते उद्घाटन होणाऱ्या या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापारेषणचे संचालक (मासं) श्री सुगत गमरे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यकारी संचालक,महावितरण श्री अरविंद भादीकर, मा.श्री.भिमाशंकर मंता कार्यकारी संचालक (मासं) महानिर्मिती,कार्यकारी संचालक,प्रादेशिक संचालक,नागपूर श्री.सुहास रंगारी, मुख्य अभियंता महावितरण अमरावती परिमंडल श्री.ज्ञानेश कुलकर्णी  राहणार आहे.
           महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटना ही महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य शासकीय कंपन्यातील वित्त व लेखा, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती व तंत्रज्ञान, दक्षता व सुरक्षा, जनसंपर्क व विधी विभागातील अतांत्रिक अधिका-यांची नेतृत्व करणारी बलाढ्य संघटना आहे.संघटनेच्या राज्यव्यापी वार्षीक ४५ व्या अधिवेशनात ऊर्जा क्षेत्रातील,तिन्ही कंपन्यांची सद्यस्थिती,खाजगीकरण व वीज उद्योग आर्थिक सक्षमीकरण यावर विचार मंथन होणार असल्याने हे अधिवेशन महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती या तिनही कंपन्यांच्या वाटचालीत दिशादर्शक ठरेल असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रवीण बागूल,सरचिटणीस श्री.संजय खाडे, संघटन सचिव श्री.प्रवीण काटोले आणि केंद्रीय कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
         हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अधिकारी संघटनेच्या  अमरावती कार्यकारिणीचे अध्यक्ष नितीन नांदुरकर, सचीव फुलसिंग राठोड अकोला कार्यकारिणी अध्यक्ष अनंत साबळे, सचिव अमोल बाहेकर,प्रशांत लहाने,यज्ञेश क्षीरसागर,प्रमोद कांबळे आणि सर्व सदस्य झटत आहे.संतांच्या भुमीत,अमरावती नगरीत संपन्न होणारे ४५ व्या वार्षिक अधिवेशनास सर्व सभासदांनी पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे.असे आव्हान संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

एक्झिट पोल प्रसारण, प्रकाशनास निवडणूक आयोगाकडून प्रतिबंध

Next Post

‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Next Post
‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add