शहादा l प्रतिनिधी
समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ यांच्या सहकार्याने व श्री. संत सेना समाज सेवा मंडळ शहादाच्या वतीने ११ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
शहादा येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ व श्री संत सेना नाभिक समाज सेवा मंडळाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आला . हा समाजाचा ८ वा व श्री. संत सेना समाज सेवा मंडळाचा वतीने द्वितीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आले होते. यासाठी केवळ नाममात्र एकवीस रुपयात वर – वधुंची नाव नोंदणी करण्यात आली होती, तसेच परंपरेनुसार आनंदमयी वातावरणात सकाळी ९ वाजता नवरदेवांची शोभायात्रा ही अंबाजी माता मंदिर खेतिया रोड पासून खरेदी विक्री संकुल पर्यंत सजविलेल्या ट्रॅक्टरवर काढण्यात आली होती व सकाळी १०:३० वाजेच्या मुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळा पार पडण्यात आला, याची जय्यत तयारी समाजसेवा मंडळाच्याच वतीने करण्यात आली होती.
या सोहळ्यात वर – वधु पालकांची स्वतंत्र बैठक व्यवस्था, धार्मिक विधीसाठी स्वतंत्र पुरोहित, फोटोग्राफर,व्हिडिओ चित्रीकरण , वाजंत्री,समाज प्रथे प्रमाणे हळद, नवग्रह शांती यज्ञ , पेहरावणी , पाणेतर,सत्यनारायण कथा,विदाई आदी सर्व विधी तसेच स्वतंत्र मोठे २ मंडप , शुद्ध पिण्याचे पाणी, भोजनावळ, उपवर – वधू व पालकांसाठीसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था , विवाह पत्रिका , वर- वधू व पालकांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, फिरते शौचालय, मंडपात सी. सी. टि. व्ही. कॅमेरा , ड्रोन कॅमेरा , वॉकी टॉकी , अत्यावश्यक सेवा म्हणून डॉक्टरांचे पथक , प्रथमोपचार कक्ष , रुग्णवाहिका , अग्निशमन दलाची गाडी तैनात करण्यात येणार आहे , मोठे एल. ई. डी. टि. व्ही. स्क्रीन , विविध प्रकारच्या सामाजिक माध्यमांवर सरळ प्रक्षेपण आदी सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करण्यात आली असून नवदांपत्यांना विविध संसार उपयोगी साहित्य व विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरण तसेच नवदांपत्यांची विदाई रोप व तुळशी देऊन करण्यात आली.
या विवाह सोहळ्यात नंदुरबार जिल्ह्यातील सहभागी वधू मातेस महिला व बालकल्याण विभागाच्या कन्यादान योजनेच्या माध्यमातून १०,००० रुपयांचे अनुदान ही मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहेत तसेच या सोहळ्याला भोजनावळीकरिता अनेक दानशूर दात्यांनी अन्नदानासाठी मदत केली. या सोहळ्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालय,महिला व बालकल्याण विभाग नंदुरबार , समाजातील विविध संस्था,संघटना, युवक व महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले. स्वतंत्र भोजन कक्षात बेटा बेटी एकसमान, बेटी बचाओ – बेटी पढाओ, अन्न – पाणी वाचवा , असा संदेश देणारी जनजागृतीपर बॅनर लावण्यात आले होते.
आ. राजेश पाडवी , माजी आमदार उदेसिंग पाडवी , दीपक बापू पाटील , राम रघुवंशी , मकरंद पाटील , अभिजित पाटील , भैयासाहेब इंदिसे , गट विकास अधिकारी संजय सोनवणे , हर्षवर्धन रघुवंशी , पी. एस. आय. राजन मोरे , ॲड. भरत मराठे , ॲड. राजेश कुलकर्णी , जगदीश पाटील , डॉ. निलम मोदी , महावीर रावल , जितेंद्र सूर्यवंशी , योगेश मराठे , डॉ. तुषार संनासे , घनश्याम पाटील , संतोष पाटील , या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र , गुजरात आणि मध्य प्रदेश आदी राज्यातील जवळपास चार ते पाच हजार समाज बांधव व आप्तेष्ट तसेच राजकीय, सामाजिक , आर्थिक , सहकार , विविध प्रसार माध्यम क्षेत्रातील मान्यवर ही आपली उपस्थित दर्शवली होती त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप आले.
आमदार राजेश पाडवी यांनी , नाममात्र शुल्क मध्ये भव्य स्वरूपात सर्वांच्या मदतीने जो सामुदायिक विवाह संपन्न झाला इतर समाजाने देखील त्याचा आदर्श घ्यावा , भविष्यात देखील समाजाने असा उपक्रम सतत राबवावा अशा उपक्रमास माझे सदैव योगदान लाभेल असे प्रतिपादन केले.
माजी आ. उदेसिंग पाडवी सुयोग्य वेळेवर काढलेल्या मुहूर्तावर शांततेने नियोजनबद्ध रीतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे सामुदायिक विवाह सोहळ्यात जो प्रचंड जनसमुदाय आला आपले सर्व कार्य बघून कौतुक करावे तेवढे थोडे आहे , असे सांगितले .
दीपक बापू पाटील यांनी बोलतांना सामुदायिक विवाह ही काळाची गरज असून या विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या सर्व वर वधू त्यांचे पालक यांचे विशेष आभार असून या सोहळ्याला सहकार्य करणारे तसेच आयोजक मंडळीला एक चांगल्या सत्कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, समाज पंच मंडळ , युवा संघ , महिला मंडळ यांच्यासह समाजातील गावोगावी असलेल्या विविध संघटना अहोरात्र परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सोनवणे , सूत्रसंचालन प्रा. अनिल साळुंके व आभार हेमराज पवार यांनी केले.








