Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छ.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तात्पुरती सिडी बसविण्यात यावी , इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनची मागणी

team by team
February 10, 2023
in राजकीय
0
छ.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तात्पुरती सिडी बसविण्यात यावी , इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनची मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार  येथील धुळे रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरावरील शिवाजी महाराज यांच्या अश्‍वरुढ पुतळ्याला अभिवादन प्रसंगी नागरीक पुतळ्याच्या चौथर्‍यावर चढून माल्यार्पण करतात. अशावेळी पुतळ्याची होवू नये म्हणून पुतळ्याला लागून तात्पुरत्या स्वरुपात सिडी बसविण्यात यावी, अशी मागणी इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन नंदुरबार येथील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आणि नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले.

ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील एलआयसी ऑफीस समोर भव्यदिव्य नाट्य मंदिर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वरुढ पुतळा आहे. या ठिकाणी जयंती व पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात पुष्पार्पण तसेच माल्यार्पण प्रसंगी कोणत्याही प्रकारची सिडीची सोय नाही. अशावेळी नागरीक पुतळ्याच्या चौथर्‍यावर चढून पुष्पार्पण तसेच माल्यार्पण करताना दिसून येतात.

अशावेळी पुतळ्याचा विटंबना झाल्याची भावना मनात येते. याप्रकरणी अनेकवेळा निवेदन दिलेली आहेत. सदर पुतळ्याजवळ कार्यक्रम प्रसंगी पूर्णदिवस नगरपालिकेच्या कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात येवून तात्पुरत्या स्वरुपाची सिडीची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरुन पुतळ्याची कुठल्याही प्रकारची विटंबना होणार नाही. येत्या दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती साजरी होत आहे. यापूर्वीच सदर प्रकाराची दखल घेवून सिडी बसविण्यात यावी, अन्यथा ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेप्रसंगी भारतीय जनहित कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सैय्यद मुख्तार अहमद, जिल्हा सचिव साहेबराव गावीत, तालुकाध्यक्ष गणेश ठाकरे, फाऊंडेशनचे सचिव दानिश बागवान, सामाजिक कार्यकर्ते तौफीक पठाण, न्हानू मालचे, देविदास ठाकरे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे आज समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने बोगस आदिवासींच्या विरोधात जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन

Next Post

नवापूरच्या ट्रामा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरीत मिळणार उपचार: पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add