नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील नैनशेवडी फाट्याजवळ वाहनाने धडक दिल्याने अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून नैनशेवडी फाट्याजवळ पायी जाणाऱ्यास धडक दिल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत पोना.खुशाल माळी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र महाजन करीत आहेत.








