नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य सरकारने मयत राहुल भोईच्या मारेकऱ्यांची सीबीआय मार्फत चौकशी करुन संशयित आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा संघातर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी नितीन सरगिर यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरालगतच्या शिंगावे शिवरात राहणारे राहुल राजू भोई (वय 22) यांच्यावर गॅंगवार पद्धतीने गावगुंडांनी पाठलाग करून नियोजनबद्धरित्या हातातील धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केला. सदरची घटना दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी शिरपूर शहरातील क्रांती नगरात भद्रा चौक या भर वस्तीत सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली. संशयित आरोपीने खून केल्यानंतर स्व संरक्षणासाठी स्वत:च्या अंगावर वार करून घेतले.त्यानंतर तो 50 ते 60 कि.मी. अंतरावर सापडला.तो जखमी होता तर एवढ्या लांब गेलाच कसा हा संशयाचा विषय असून संबंधित आरोपी राज्य पोलीस खात्याचा खबरी असल्याचा स्थानिकांचा आक्षेप आहे.अशा परिस्थितीत पिडितास न्याय मिळणार नाही. सदरील काळीमा फासणाऱ्या या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत.
1)खुनातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी
2)आरोपींना मोक्का कायद्याअंतर्गत अटक करावी
3)खटला जलद गती न्यायालयात फास्टट्रॅक कोर्ट चालवण्यात यावा 4)त्यासाठी प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट उज्वल निकम यांची शासनातर्फे नियुक्ती करण्यात याव।
5)दोषींना फाशीची शिक्षा व्हावी सदर प्रकरणी मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर चंद्रकांत खेडकर, रामकृष्ण मोरे, डॉ. गणेश ढोले,सिताराम भोई,तुकाराम खेडकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.