नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा हा ऐतिहासिक वास्तू व ऐतिहासिक गोष्टीसाठी नेहमीच चर्चेत राहिलेला आहे अशातच आज देखील नंदुरबार शहराच्या मध्यभागी असलेली रंगमहाल हे एक ऐतिहासिक वास्तू लोकांसाठी आकर्षण ठरते. या वास्तूची अनेक ऐतिहासिक बाबी आहेत. आज नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ.बी जी शेखर पाटील यांनी नंदुरबार शहरातील ऐतिहासिक वास्तू रंगमहाल ची पाहणी केली व या वास्तूबद्दल माहिती जाणून घेतली.
हे रंगमहाल प्राचीन कालीन असून मोघलांच्या काळातले आहेत ज्यावेळी औरंगजेब युद्ध करण्यासाठी जात होते.त्यावेळी औरंगजेब या महाल मध्ये विश्राम करत असायचे अशी माहिती या वास्तू बद्दल आहे.
या ऐतिहासिक वास्तू बद्दल असलेल्या सर्व गोष्टी सर्व बाबी डॉ. बी.जी.शेखर यांनी रंगमहालचे मालक महेश देसाई यांच्याकडून जाणून घेतल्या. या रंगमहालची पाहणी करतांना डॉ. बी.जी.शेखर पाटील अतिशय आनंदी दिसून आले व मोठ्या उत्सुकतेने त्यांनी रंगमहाल बद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस निरीक्षक निलेश तांबे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर ,शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर , रंगमहालचे मालक महेश देसाई ,उमाशंकर देसाई व अधिकारी उपस्थित होते.