म्हसावद l प्रतिनिधी
5 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नंदुरबारमध्ये वरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेचे उदघाटन माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते झाले प्रमुख अतिथी म्हणून सौ.रत्नाताई रघुवंशी नगराध्यक्षा नगरपरिषद नंदुरबार व बांधकाम समिती सभापती नगर परिषद नंदूरबार चे अमित रघुवंशी उपस्थित होते. कल्चरल फाऊंडेशन तर्फे दर वर्षी पुरस्कार जाहीर केला जातो या वर्षी कला गौरव पुरस्कार अभिनय सम्राट जितेद्र खवळे याना माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले.त्यांनी अभिनय क्षेत्रात सतत 20 वर्ष योगदान दिले आहे .
कार्यक्रमात 14 समूह नृत्य व 16 सोलो नृत्य सादर करण्यात आले .गेल्या 17 वर्षांपासून सदर स्पर्धा घेत आलेलो आहे. विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.समूहनृत्य लहान गटात प्यारीबाइ ओसवाल प्राथमिक शाळा,माय चाईल्ड पब्लिक स्कूल, डॉ काणे मुलींची शाळा ,महेंद्र पब्लिक स्कूल,एकलव्य हायस्कूल नंदुरबार हे विजयी ठरले.समूह नृत्य मोठ्या गटात
मूक बधिर विद्यालय दुधाळे,अभिनव विद्यालय ,मिशन इंग्लिश मेडिअम,शासकीय मुलींची आश्रम शाळा होळशिवार,डॉ काणे विद्यालय नंदुरबार,व श्रॉफ हायस्कूल यांनी बक्षिसे मिळवली.
सोलो नृत्य लहान गटात
निवेश अग्रवाल,प्रतीक्षा भूषणार,रक्षिता शर्मा,त्रिशा वाघांनी,निरल चौधरी,हे अनुक्रमे विजयी झाले. सोलो नृत्य मोठ्या गटात विशाल चौधरी,इशिका जग्याशी,नेहा महाजन,प्राजक्ता इंदवे,गौरी पटेल हे अनुक्रमे विजयी झालेत सर्वाना नगराध्यक्षा करंडक ने सन्मानित करण्यात आले व रोख बक्षिसे व सहभाग प्रमाण पत्र देण्यात आले.
बक्षीस वितरण कल्चरल फाऊंडेशन चे अध्यक्ष राजेश रघुवंशी,सचिव सुभाष मोरावकर, डॉ.सपना अग्रवाल,राजेश अग्रवाल,चंपालाल चौधरी ,प्रवीण पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन धर्मेंद्र भारती,डॉ.सपना अग्रवाल व प्रोजेक्ट चेअरमन दुर्गेश वैष्णव यांनी केले परीक्षक म्हणून फिल्म व्यावसायिक कोरीओ ग्राफर गजानन तोष्णीवाल अकोला यांनी भूमिका स्वीकारली
कार्यक्रमात मोलाचे सहकार्य काशिनाथ सूर्यवंशी, डॉ.दिनेश देवरे,श्रीराम मोडक, कमलाकर बागुल व श्रॉफ हायकूलच्या विद्याथ्यांनी केले.नंदुरबार परिसरातील 14 शाळांनी यात सहभाग घेतला.








