नंदुरबार l प्रतिनिधी
येथील चावरा पब्लिक स्कूलमधील इ.१ लीची विद्यार्थीनी धनिषा प्रशांत ठाकरे हिने मेंटल मॅथ्स कॉम्पिटीशनमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवित गोल्ड मेडल मिळविले आहे.
नंदुरबार येथील स्त्री रोगतज्ञ डॉ.प्रशांत ठाकरे व डॉ.प्रीती ठाकरे यांची धनिषा मुलगी आहे.ती नंदुरबार येथील चावरा पब्लिक स्कूलमध्ये शिकत असून इ.१ लीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या मेंटल मॅथ्स कॉम्पिटीशनमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवित तिने गोल्ड मेडल मिळविले आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.चावरा स्कूलचे फादर टेनी यांच्याहस्ते धनिषा हिला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले असून तिचे कौतुक केले.यावेळी डॉ.प्रशांत ठाकरे व डॉ.प्रीती ठाकरे उपस्थित होते.