नवापूर l
नंदुरबार पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतुन स्मित मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल नंदुरबारतर्फे नंदुरबार जिल्हातील सर्व पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व अमलदार यांची रक्त तपासणी शिबिर आयोजित केली आहे.त्या अनुषंगाने नवापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्मित हॉस्पीटलचा साह्याने रक्त तपासनी शिबिर घेण्यात आले.
यावेळी सहायक पोलिस निलेश वाघ,उपनिरीक्षक अशोक मोकळ व नवापूर व विसरवाडी पोलिस स्टेशनचे अमलंदार यांनी रक्त तपासनी करुन घेतली.नवापूर पोलिस स्टेशन पोलिस अधिकारी अमलदार कर्मचारी मिळुन एकुन ४४ व विसरवाडी पोलिस स्टेशन पोलिस अधिकारी,अमलदार कर्मचारी ८ असे एकुन ५२ जणांची रक्त तपासणी करण्यात आली.या नंतर पोलिस कर्मचारी यांच्या कुंटुबानी रक्त तपासणी करुन घेतली.








