नवापूर l प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद बजरंग दल नवापूर प्रखंड व हिंदू मेळावा आयोजन समितीच्या वतीने शहरात आज दि ५ फेब्रुवारी रविवारी भव्य हिंदू मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय संत कालीचरण महाराज हे आशीर्वचन करणार आहेत.या भव्य हिंदू मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण झाल्याची माहिती हिंदू मेळावा आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
दि५ रविवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान शहरातील श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे,मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथील राष्ट्रीय संत कालीचरण महाराज हे आपल्या अमृत वाणीतून आशीर्वचन करणार आहेत.मेळाव्यात तालुक्यातील धारेश्वर मंदिराचे संत रुद्रपुरी महाराज,दत्त उपासक नरेंद्र निळकंठ जोशी [बाबा काका], व्याराचे रविबापू महाराज, साक्री येथील प्रजापती ब्रह्मकुमारी संप्रदायाचे शिला दिदि,बीएपीएस स्वामिनारायण संप्रदाया उकाई मंदिराचे साधक कृणाल अहीर,लालबरीचे दत्त उपासक वसंत महाराज मौलीपाडाचे जमनादास महाराज,बर्डीपाडाचे जामसिंगबाबा महाराज,सुकलवेचे चामुंडामाता मंदीराचे महंत गुमांसिंग महाराज,वडकुटचे जालमसिंग महाराज,छापटीचे छीड्यादास महाराज, कुकरांनचे भीमा महाराज,रंजनपुरचे जितू महाराज,कोळद्याचे गोपाल महाराज,बिल्गाव्हाण येथील भातीजी महाराज संप्रदायाचे प्रेमलाल महाराज,उमराण येथील मोक्षमार्गी संप्रदायाचे मजनू दादा महाराज बंधारे येथील दासुभाई महाराज शेहीचे प्रल्हाद महाराज तसेच स्थानिक आदिवासी जनजाती चे संत उपस्थित राहणार आहे.
आदी संतगण उपस्थित राहणार आहेत संदर्भात समितीच्या वतीने नवापूर शहरासह तालुक्यात विसरवाडी, खांडबारा, चिंचपाडा आदींसह विविध गावात जावून धार्मिक,सामाजिक,व विविध क्षेत्रातील नागरिकांशी बैठका घेवून जन जागृती करण्यात आली आहे दुपारी चार ते पाच दरम्यान गांधी पुतळा समोरील हनुमानजी मंदिरापासून शोभा यात्रा निघणार आहे. मेळाव्यात उपस्थितांसाठी भोजन व्यवस्था सह भव्य स्टेज वाहनाची पार्किंग,पाणी व्यवस्था,महिला पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था,करण्यात आली आहे भव्य हिंदू मेळाव्यात राष्ट्रीय संत कालीचरण महाराज हे आपल्या अमृत वाणीतून आशीर्वचनाचा लाभ घ्यावा अशी विनंती विश्व हिंदू परिषद बजरंग दल नवापूर प्रखंड व हिंदू मेळावा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.








