नंदूरबार | प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद शिक्षण सभापती गणेश पराडके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व फीत कापून करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मिनाताई राहसे, उपसरपंच मीराबाई वळवी, शिक्षण विस्तार अधिकारी शामराव ईशी, केंद्रप्रमुख रतिलाल खर्डे मांडवी खुर्द, सर्व ग्रामपंचायत सदस्य व मांडवी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक ,शिक्षक, विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी केंद्रातील १६ शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. अध्यक्षीय भाषणात गणेश पराडके यांनी सांगितले की,लहान वयातच विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होऊन क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे.मांडवी खुर्द केंद्राने आयोजित केलेली स्पर्धा मुलांना प्रोत्साहन देईल असे सांगितले.
केंद्रप्रमुख रतिलाल खर्डे,सरपंच,उपसरपंच व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस पारितोषिक वितरण करण्यात आले.तसेच विविध प्रकाराच्या खेळामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणार्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मांडवी शाळेतील शिक्षक गणेश भट्ट ,संदीप रोकडे, भरत देशमुख, करणसिंग तडवी यांनी केले.आभार प्रदर्शन संदीप रोकडे व गणेश भट्ट यांनी मानले.
 
			
 
                                







