नंदूरबार | प्रतिनिधी
प्रत्येक घराला स्वच्छ पाणी मिळेल यासाठी राज्य सरकार सोबतच जिल्हा परिषद देखील काम करत आहे. काही अडचणी असल्यास माझ्याशी संवर्क करा असे आवाहन जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी केले. नंदुरबार तालुक्यातील १८ गावांमध्ये जल जीवन मिशनच्या कामांच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.
राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केली आहे. तर आदिवासी भागांसाठी राज्य सरकारातील आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या खात्यातून आदिवासी भागांसाठी निधी दिला जात आहे. मात्र या योजनेत सर्वाधिक महत्वाची भूमिका जिल्हा परिषदेची आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत या योजनेला चालना देण्याचे काम जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी सुरू केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत स्वच्छ पिण्याच्या पाणी मिळावं यासाठी आज नंदुरबार तालुक्यातील जलजीवन मिशनअंतर्गत १८ गावांचे भूमिपूजनकरण्यात आले. यामध्ये धिरजगाव,फुलसरे,निमगाव,उमज,लहान उमज,वाघशेप,कोठडे,खटावड,देवपूर,नटावद,भावणीपड, लहान मालपूर,मालपूर,आर्डीतारा,पावला, मंगरूळ,भांगडा, टाकलीपादा या गावांच्या आज भूमिपूजन करण्यात आलं आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगीतले की, गावातील पाईपलाईन पाण्याची टाकी व प्रत्येक घराला स्वच्छ पाणी मिळेल यासाठी राज्य सरकार सोबतच जिल्हा परिषद देखील काम करत आहे. जिल्ह्यातील एकही कुटुंब पाणी विना राहणार नाही तर या योजनेत कुठलीही अडचण आली तर सरळ माझ्याशी संपर्क करू शकतात असे यावेळी अध्यक्षांनी सांगितलं नंदुरबार तालुक्यातील कोठली गट, गणाची आणि पावला गणाचे गावांमध्ये भूमिपूजन पार पडले आहेत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजश्री गावित, जिल्हा परिषद सदस्य अर्चना गावित, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश गावित, पंचायत समिती सदस्य मालती वळवी पंचकुशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.