Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने  तरुणाचा खून, संशयित स्वतः पोलीस ठाण्यात झाला हजर, गुन्हा दाखल

team by team
February 4, 2023
in क्राईम
0
नंदूरबार येथे धारधार शस्त्राने तरुणाचा झाला खून, तणावाचे वातावरण
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुत्रांच्या माहितीनूसार, मच्छी बाजार परिसरात राहणाऱ्या जयेश सोनवणे याने बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून काल दि.3 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास नंदुरबार शहरातील बोहरी मशिदला लागून असलेल्या रस्त्यावर सातपर बाबा दर्गाच्या समोर जयेश दयाराम गंगावणे रा. सां. बा. विभाग कार्यालयाच्या शासकीय निवास्थान, मच्छी बाजार, नंदुरबार याने यातील मयत अरबाज खाटीक यांच्या छातीत चाकु खुपसून त्यास गंभीर दुखापत करून जिवेठार मारले याप्रकरणी  राज सलिम खाटीक रा. घरकुल जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून  जयेश दयाराम सोनवणे रा. सा. बां.विभाग कार्यालयाच्या शासकिय निवास्थान मच्छी बाजार नंदुरबार याच्या विरुद्ध भादवि क ३०२ ५०६ (२) सह महा. पो. का. चे कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोनि  रविंद्र कळमकर करीत आहेत.
दरम्यान बहिणीचा चार वर्षापूर्वी प्रेमविवाह केल्याची खदखद मनात ठेवून चाकू खुपसून खून केल्याचे सांगण्यात येत . सदर घटना घडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी संतप्त जमाव जमला होता. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले. संशयित जयेश गंगावने यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कायदा आणि सुव्यवस्था भंग करणाऱ्याची हयगय केली जाणार नाही, कोणीही अफवा पसरवू नयेत, शांतता राखावी, असे आवाहन पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी केले. दरम्यान, घटनास्थळासह परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरात तणावपूर्ण शांतता होती. कोणीही घटनेबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले. दरम्यान खून केल्यानंतर संशयित आरोपी शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.
बातमी शेअर करा
Previous Post

बंदे मे है दम : गणेश माळीची शिक्षणाची जबाबदारी घेत आ.राजेश पाडवी यांनी स्वीकारले पालकतत्व

Next Post

 रस्त्यांची दुर्दशा : ६ फेब्रुवारी रोजी म्हसावद येथे रस्ता रोको आंदोलन

Next Post
 रस्त्यांची दुर्दशा : ६ फेब्रुवारी रोजी म्हसावद येथे रस्ता रोको आंदोलन

 रस्त्यांची दुर्दशा : ६ फेब्रुवारी रोजी म्हसावद येथे रस्ता रोको आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add