शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकादमी (एमएसएफडीए) अंतर्गत तर्कशुद्ध विचार कक्षाचे (आरटीसी) उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकादमी (एमएसएफडीए) अंतर्गत एफ.डी.पी. प्रशिक्षण घेतलेल्या विविध विषयाच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील हे होते. प्रास्ताविक डॉ.मृणाल जोगी यांनी केले. तर तर्कशुद्ध विचार कक्षाचे (आरटीसी) अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यक्रम व उपक्रमाची माहिती प्राध्यापक डॉ. प्रशांत तोरवणे यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. मिलिंद पाटील यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील विविध विद्याशाखेचे प्राध्यापक व पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.