नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्रातून गुजरात मध्ये जाण्यासाठी कमी अंतराचा असलेला चरणमाळ घाट रस्ता. अतितीव्र वळण उताराचा घाट रस्ता असल्याने. या रस्त्यावर वारंवार अपघात होतात. काल रात्री दीड वाजेच्या सुमारास कोपरगाव हुन गुजरात राज्यातील गांधीधाम येथे मका घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला होता. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला होता. तर वाहनाचे व मका मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

आज पुन्हा बारा वाजेच्या सुमारास केमिकल टाक्या घेऊन जाणारा आयशर टेम्पो तीव्र उताराच्या वळणावर पलटी झाला असून. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. आयशर टेम्पोचे दोन तुकडे झाले आहे. चालक जखमी झाले आहे.
अवजड वाहन चालकांनी चरणमाळ येथील तीव्र उताराच्या वळण घाट रस्त्यावरून जाणे टाळावे जेणेकरून अपघात होणार नाही.








