शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.डी.सिंदखेडकर उपस्थित होते.प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा .डॉ. तुषार पटेल हे होते. यावेळी प्रा.डाॅ. यु.व्ही.निळे,प्रा.डॉ.डी.एम. गांगुर्डे,प्रा.डॉ.विजयप्रकाश शर्मा,प्रा .आर.एस. माळी,प्रा .एस. एस. पवार यांची उपस्थिती होती. प्रा.डाॅ. तुषार पटेल यांनी मराठीचे संवर्धन,मराठी भाषेचे सौंदर्य,मराठीचे जीवनातील स्थान व मराठीतील समृद्ध साहित्य याबाबतची माहिती दिली.
यावेळी डॉ .गांगुर्डे, डॉ .शर्मा यांनीही मराठी भाषेविषयी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.शिंदखेडकर यांनी मराठी भाषेचे अलंकारिक सौंदर्य स्पष्ट करीत मराठीच्या दैनंदिन जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.मंगला पाटील यांनी केले. कार्यक्रमास मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांसह प्रा . दिनेश पाटील,प्रा.पठाण,विजय निकम यांची उपस्थिती होती.