नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील माय चाईल्ड पब्लिक स्कुलमध्ये सांस्कृतिक व वार्षिक पारितोषीक नुकताच पार पडला. यावेळी ३०० विद्यार्थ्यांची विविध विषयांवर नाटीका, नृत्य सादर करुन उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
माय चाईल्ड पब्लिक स्कुलचा ८ वा सांस्कृतिक व वार्षिक पारितोषीक कार्यक्रम येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ.हिना गावीत ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत, उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण, अर्जुन तानाजी बोरसे, क्षत्रिय महासभेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मोहितसिंग राजपूत, अनिल पाटील, संजय शाह आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.सुप्रिया गावीत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाले. यावेळी सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. विविध नृत्य व नाटकाद्वारे समाजासाठी रियल हिरो पालक व पैसा, अन्न, एकता या सर्व मुख्य जीवनशैलीचे विद्यार्थ्यांनी महत्त्व पटवून दिले. यावेळी खा.डॉ.हिना गावीत यांनी शाळेचे कौतुक केले. अल्पावधीतच माय चाईल्ड स्कुलने विविध उपक्रम राबवून शाळेला नावलौकीक मिळविला. कार्यक्रमाचे आयोजन माय चाईल्ड पब्लिक स्कुलच्या संचालिका सौ.पुजा मयुर वाणी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.