नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा शिवारात बायोडिझेल सदृष्य ज्वालाग्रही पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगल्याने चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्वालाग्रही पदार्थांसह सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा शिवारात एका हॉटेलजवळ फिरोज लाखाभाई आघाम, रवि गुलाबचंद दरजी, अभिषेक अनिल वसावे व सुनिल सुरेश गावित (सर्व रा.नवापूर) हे चौघेजण त्यांच्या ताब्यातील पत्र्याच्या शेडमध्ये व गोडावूनमध्ये बायोडिझल सदृष्य ज्वालाग्रही द्रव्याचा साठा बेकायदेशीररित्या साठवून व विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगतांना आढळून आले.
तसेच आग प्रतिबंधक उपाययोजना दिसून आली नाही. याबाबत नवापूर तहसीलचे पुरवठा निरीक्षक पंकज खैरनार यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम २८५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मनोज पाटील करीत आहेत.