नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे मुलीला शनिमांडळ येथून नंदुरबार येण्यासाठी ॲपेरिक्षात बसण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन चालकास काठीने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील ज्ञानेश्वर साहेबराव पाटील यांनी त्यांच्या ताब्यातील ॲपेरिक्षा (क्र.एम.एच.३९-३५५) चुडामण सिताराम पाटील यांच्या मुलीला शनिमांडळ येथून नंदुरबार येण्यासाठी ॲपेरिक्षात बसण्यास नकार दिला. या कारणावरुन ज्ञानेश्वर पाटील यांना चुडामण सिताराम पाटील, पृथ्वीराज चुडामण पाटील, युवराज सिताराम पाटील यांनी शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच पृथ्वीराज पाटील याने काठीने मारहाण करुन दुखापत केली.
याबाबत ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२५, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.ज्ञानेश्वर सामुद्रे करीत आहेत.