नंदूरबार l प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने खाई ता.अक्कलकुवा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत ध्वजाचे ध्वजपूजन खाई गावाचे सरपंच संपत पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुकेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ध्वजाला सलामी देत विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या राष्ट्रगीत म्हटले.त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर व इतर गीतावर अभिनव नृत्य आपले कला अविष्कार सादर केले.त्यांचे नृत्य पाहून सर्व ग्रामस्थांनी त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
येथील ग्रामस्थांनी शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य पाहून बक्षीस देण्यात आले.यावेळी उपसरपंच शेमट्या पाडवी,पोलीस पाटील दिलवरसिंग वळवी,किसन वळवी,कोतवाल नरपत वसावे,गेमलसिंग महाराज,गेमलसिंग पाडवी,धनजी पाडवी, सायसिंग वसावे, ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य रीना पाडवी, अनिश पाडवी,भरत पाडवी,सुनील पाडवी, गमरसिंग वळवी, दिनेश वसावे,डॉ राजेश पवार इतर अंगणवाडी ताई,आशाताई, तरुण मित्र,शाळेचे मुख्याध्यापक वनसिंग पाडवी शिक्षक गुलाबसिंग पटले तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.