म्हसावद l प्रतिनिधी
विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय आमलाड येथे माजी विद्यार्थी डॉ. रमेश मानसिंग पाडवी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण करून ध्वजवंदन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सौ.विद्याताई तांबोळी, संस्थेचे मार्गदर्शक अशोक तांबोळी, सरपंच सौ. लताबाई सतीवान पाडवी, उपसरपंच किरणभाऊ कोळी, ग्रामसेवक यजुवेंद्र सुर्यवंशी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अमरचंद नागमल, शाळेचे मुख्याध्यापक एन. व्ही. मराठे उपस्थित होते.
याप्रसंगी मानव मिशन अंतर्गत विद्यार्थीनीना सायकलचे वाटप करण्यात आले.तद्नंतर माजी विद्यार्थ्यांच्या मेळावा आयोजित करून त्यांच्या स्मृती चिन्ह देवून सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात विद्यार्थ्यांनी देशभक्ती व समाज प्रबोधन पर नृत्य व नाटक सादर केले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्रीमती आशा जाधव व आर.के.पाडवी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक आर. बी.कुवर, ए.ए.शेंडे, एस.ए.सुर्यवंशी, डी. एन.गिरासे, वाय.एस.मासुळे, श्रीमती सारिका चौधरी, श्रीमती सुनीता चव्हाण , शिपाई लखन पाडवी यांनी परिश्रम घेतले.