चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर
आरोग्य वर्धिनी केंद्र सोमावल अंतर्गत श्रीकृष्ण खांडसरी अक्कलकुव्वा रोड तळोदा येथील ऊसतोड कामगार वसाहत येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले.
आरोग्य वर्धिनी केंद्र सोमावल कार्यक्षेत्राजवळील ऊसतोडसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर गावाहून यात कन्नड, चाळीसगांव, औरंगाबाद, धडगांव, तळोदा, अक्कलकुव्वा, नंदुरबार आदी ठिकाणांहून दरवर्षी ऊसतोडणी कामगार येतात. यात प्रामुख्याने गरोदर माता, स्तनदा माता ० ते ६ वर्षे बालके तसेच ६ वर्षे वरील सर्व स्त्री, पुरुष यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार व लसीकरण करण्यात आले. तसेच किरकोळ आजारांचे रुग्ण तपासून औषधोपचार करण्यात आला.
या शिबीरामध्ये विशेष गरोदर माता व स्तनदा माता यांच्या संपूर्ण रक्त तपासण्या, लघवी तपासणी करण्यात आले व आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आले. यात गरोदर माता ११, स्तनदा माता २७, ० ते ६ वर्षे बालके २८, किशोरवायीन १९ इतर आजारांचे रुग्ण ५३ असे एकूण आरोग्य तपासणी रुग्ण २६५ एवढे रुग्ण तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचे आयोजन सोमावलचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुधीर ठाकरे यांनी केले होते. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून तळोदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी डाॅ.दिपेश बोरसे, डाॅ.गौरव सोनवणे, डाॅ.तुषार पटेल, डाॅ.प्रशांत वळवी, भावना ढोलार, हर्षल चौधरी, एस.एस.तडवी, ए.व्ही.कुवर, एस.ए.ठाकरे, आर.व्ही.आगळे, व्ही.जे.सुसर, एन.एस.तुपे, आर.एम.वसावे, ए.एस.करमरकर, पी.ए.वळवी, जे.एस.वसावे आदी सहकार्य लाभले.