Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

team by team
January 28, 2023
in राजकीय
0
रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, खा.डॉ.हिना गावीत यांना दिले निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी

मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करुन कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे, पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,तांत्रिक सहाय्यक लिपिक,डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी याबाबत खा.डॉ.हिना गावीत,पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांना निवेदन दिले.

सदर निवेदनात म्हटले आहे की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी तत्वावर मागील १० ते १२ वर्षापासून कर्मचारी कामे करीत आहेत. कोरोना काळातही कोणतीही शासकीय सुविधा नसतांना मग्ररोहयो अंतर्गत योजनांचे गावामील प्रत्येक मजूराला कामे उपलब्ध करुन देऊन रोजगार दिला आहे. असे असतांना मागील ३ ते ४ वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ केलेली नाही. तसेच मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा करुन कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे आकृतीबंधामध्ये समायोजन करण्यात यावे, योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी,

ग्राम रोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या, मध्यप्रदेश शासन प्रमाणे वयाच्या ६२ व्या वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी आदी मागण्या निवेदनातून नमूद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, एक दिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले होते.तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून मागण्या मान्य न झाल्यास दि.२५ जानेवारी रोजी असहकार व त्यानंतर दि.१ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा निवेदनातून देण्यात आले होते.
याबाबत पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा.डॉ हिना गावीत यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी राज्य सहसचिव सुधीर पवार, जिल्हाध्यक्ष हर्षल वानखेडे, तालुका अध्यक्ष राहुल बोरसे,श्यामसुंदर सामुद्रे, राकेश सोनवणे, महेश नेरकर, दीपक मराठे, गणेश प्रजापती, विनोद साबळे, मिलिंद वळवी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Next Post

आता मनरेगा मस्टरवरील ग्रामसेवकांची स्वाक्षरी झाली बंद

Next Post
आता मनरेगा मस्टरवरील ग्रामसेवकांची स्वाक्षरी झाली बंद

आता मनरेगा मस्टरवरील ग्रामसेवकांची स्वाक्षरी झाली बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add