Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

घरफोडी करणारे दोन अल्पवयीन 24 तासांच्या आत शहादा पोलीसांच्या ताब्यात, दिड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

team by team
January 27, 2023
in क्राईम
0
घरफोडी करणारे दोन अल्पवयीन 24 तासांच्या आत शहादा पोलीसांच्या ताब्यात, दिड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

नंदूरबार l प्रतिनिधी

 

घरफोडी करणारे दोन अल्पवयीन 24 तासांच्या आत शहादा पोलीसांच्या ताब्यात, 1 लाख 33 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की , 24 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते सांयकाळी 5. वा. दरम्यान श्रीमती अनिता देविदास मराठे यांच्या शहादा शहरातील विजय नगर येथील घराच्या दरवाजाचे कुलुप अज्ञात आरोपीतांनी तोडुन 3 हजार रु रोख व 1 लाख 32 हजार 300 रु कि. सोन्याचे दागिने असा एकुण 1 लाख 35 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला म्हणून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द् भा.दं.वि. कलम 454,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

शहादा शहरातील विजय नगर सारख्या परिसरात दिवसा झालेल्या घरफोडीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. सदर घटनेबाबत शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सदर घटनेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व इतर अधिकाऱ्यांना तात्काळ कळविली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नंदुरबार अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्याचे 3 वेगवेगळे पथके तयार करुन गुन्हा घडकीस आणून गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेश दिले.

 

 

25 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा शहरातील विजय नगरमध्ये झालेली चोरी शहादा शहरातील श्रमीक नगर परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी केली असल्याची बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना सांगितली. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी शहादा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना सदरची माहिती सांगून संशयीत अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून विचारपुस करण्याबाबत आदेश दिले.

 

 

शहादा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी तात्काळ मिळालेल्या माहितीमधील दोन अल्पवयीन मुलांची माहिती काढली असता, ते घरी असल्याचे समजले. पथकाने अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांसमोर ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारून विजय नगर येथील चोरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरची चोरी केली असल्याचे सांगितले. म्हणून त्यांना चोरी केलेले सोन्याचे दागिने व पैसें कोठे आहे ? याबाबत विचारले असता त्यांनी घरात ते लपवून ठेवल्याचे सांगितल्याने 1 लाख 32 हजार 300 रु कि. सोन्याचे दागिने व 1 हजार 100 रुपये रोख असा एकुण 1 लाख 33 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे.

 

 

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्य मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, पोलीस उप निरीक्षक जितेंद्र पाटील, पोलीस नाईक संदीप लांडगे, पोलीस अंमलदार मुकेश राठोड भरत उगले, किरण जिरेमाळी, अजित नागलोत यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चरणमाळ घाटात वाहन चालकास मारहाण

Next Post

जिल्हा पोलीस दलातील 5 अमंलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षकांनी दिली पदोन्नतीची भेट

Next Post
जिल्हा पोलीस दलातील 5 अमंलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षकांनी दिली पदोन्नतीची भेट

जिल्हा पोलीस दलातील 5 अमंलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षकांनी दिली पदोन्नतीची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add