नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रातून चोरट्याने कॉम्प्यूटर व बायोमेट्रीक मशिन चोरुन नेले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सदर आरोग्य केंद्रातून चोरट्याने प्रवेश करुन १५ हजार रुपये किंमतीचा कॉम्प्यूटर व ५ हजार रुपये किंमतीचे बायोमेट्रीक मशिन असे साहित्य चोरुन नेले.
याबाबत सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल शिवाजी पावरा यांच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.ठाणसिंग राजपूत करीत आहेत.