नंदुरबार | प्रतिनिधी
हिंदु हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेतर्फे जिल्हा रुग्णालयात तसेच मतिमंद व मुकबधिर विद्यार्थ्यांना फळ वाटप आणि प्रतिमा पुजनाने बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप तसेच दुधाळे शिवार व कल्याणेश्वर मंदिर परिसरातील मतिमंद व मुकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ आणि प्रतिमा पुजनाने नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेतर्फे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, युवती जिल्हाप्रमुख मालती वळवी, युवासेना उपजिल्हाधिकारी सागर पाटील, नंदुरबार तालुकाप्रमुख विजय ठाकरे, आनंदा पाटील, भक्तवत्सल सोनार, दिनेश भोपे, गिरीश मराठे, यश तारगे, गोविंदा चौधरी, चेतन मराठे, धीर घाटे आदी उपस्थित होते.