म्हसावद l प्रतिनिधी
राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका मधील शिक्षकांच्या विविध समस्यांकडे नगर विकास विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाने आझाद मैदान येथे छेडलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यातून नपा मनपातील शिक्षक सहभागी झाले व सत्ताधाऱ्यांना मुंबई येथील आझाद मैदानात आपली ताकद दाखवून दिली.
नासिक विभागातील पदाधिकारी ओम गोखले, करणसिंग चव्हाण, ईश्वर पाटील, विकास तरटे, शिरीष पवार ,जमील मोमीन, इरफान, सचिन आव्हाड, संतोष सदाराव, भरत पाटील, सुजितकुमार पांडे,निशा सोनवणे, जहुर पिंजारी, मुदतशीर काजी, मुजाहिद ,जैव ,श्री.लांबोळे, विजय सोनवणे, गोपाल सोनवणे, कमलाबाई सोनवणे, तसेच भुसावल ,सावदा 40 गाव, जळगाव, मनमाड, नांदगाव, दोंडाईचा, नंदुरबार,धुळे येथून आंदोलनात 154 सहभाग घेतला अशा प्रकारे राज्यातून कोल्हापूर सह, रायगड, सातारा, सांगली, अकोला, वासिम, गडचिरोली, नांदेड, नागपूर, उस्मानाबाद, नंदुरबार, धुळे ,जळगाव, नाशिक, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, मुरुड जंजिरा, आणि लातूर येथील 5 हजार शिक्षक बंधू भगिनींनी आझाद मैदान येथे उपस्थिती दिली.
राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना 100 टक्के वेतन मिळायलाच पाहिजे, शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी, जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणेच ऑनलाईन बदली पोर्टल सुरू करावी, नगर विकास विभागाचे नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षण विभाग स्थापन करावा, शहर पातळीवर केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी ,यासारखी पदे निर्माण करून शिक्षकांना पदोन्नती द्यावी आधी मागण्यासाठी राज्यातून हजारोच्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. राज्याध्यक्ष अर्जुनराव कोळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन यशस्वी झाले.








