Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी केली तोरणमाळ तेथे पाहणी

team by team
January 21, 2023
in शैक्षणिक
0
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांनी केली तोरणमाळ तेथे पाहणी
म्हसावद l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील महाराष्ट्रातील शासनाची पहिली आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ येथे 2017 मध्ये स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या थंड हवेच्या ठिकाणी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ ही नंदुरबार शहर मुख्यालय तीन वर्ष कार्यरत होती गेल्या दोन वर्षापासून तोरणमाळ येथील प्रशस्त वास्तुत स्थलांतरित झाली. तोरणमाळ परिसरातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या प्रवाहात कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी ही शाळा निश्चितच फलदायी ठरताना दिसून येत आहे. नुकतेच या शाळेला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण उपसंचालक नाशिक डॉ. बी.बी.चव्हाण यांच्यासह एमपीएससीच्या उपसंचालक श्रीमती वैशाली वीर, एम.पी. एस.पी चे सल्लागार  सिद्धेश वाडकर, उपअभियंता  योगेश बोराडे, यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी भेट दिली.
 शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा व वाद्यासह सर्व अधिकाऱ्यांचं स्वागत केलं तसेच उपस्थित अधिकाऱ्यांसमोर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून भावी शिक्षणाचा मनोदय व्यक्त केला सदर प्रसंगी माननीय सचिव महोदय यांनी शाळेच्या भौतिक गरजा शिक्षक कमतरता व इतर गरजांसाठी लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्याबाबत आश्वासित केले भविष्यवेधी शिक्षण विचारासाठी सदर शाळा संगणकीकृत करून आयसीटी लॅबसह विज्ञान प्रयोगशाळा क्रीडा सुविधा देण्याबाबत अधिकाऱ्यांनी आश्वासित केले. निश्चितच भावी काळात या दुर्गम परिसरातील वाड्यावस्था वरील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल यात शंका नाही.
सदर कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण सभापती गणेश पराडके ,डायट प्राचार्य डॉ.जगराम भटकर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी  मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, वरिष्ठ अधिव्याख्याता  प्रवीण चव्हाण, रमेश चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, अधिव्याख्याता डॉ. संदीप मुळे, गटशिक्षणाधिकारी  राजेंद्र बच्छाव, यांच्यासह विस्तार अधिकारी  वाकोडे ,शामराव ईशी केंद्रप्रमुख  नरेंद्र महिरे, चौधरी परिसरातील गुणवत्तापूर्ण काम करणारे शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक व जिल्हा परिषद यंत्रणा यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथील मंगल बाजारात दुकान फोडली, ३५ हजार रुपये लंपास

Next Post

श्रीमती डी.आर.हायस्कूल मध्ये पुस्तक मेळावा

Next Post
श्रीमती डी.आर.हायस्कूल मध्ये पुस्तक मेळावा

श्रीमती डी.आर.हायस्कूल मध्ये पुस्तक मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add