नंदुरबार l प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच नंदुरबार जिल्हा
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यापीठ विकास मंच नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने अधिसभा निवडणूका तयारी साठी पूर्व व वर्तमान कार्यकर्ता एकत्रीकरण घेण्यात आले. यात राज्यपालद्वारे निर्देशित आलेल्या व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिसभा सदस्यांचे सत्कार करण्यात आले व नुकतेच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले प्राचार्य व संस्थाचालकांचा देखील सत्कार करण्यात आला.


या एकत्रीकरणात विद्यापीठ विकास मंचाच्या कार्याची माहिती सांगणाऱ्या अंकाचे देखील अनावरण करण्यात आले. या वेळी मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. हिना गावित, अभाविप देवगिरी प्रदेश उपाध्यक्ष मनीष जोशी, अभाविप विभाग संघटनमंत्री शुभंम स्वामी, अभाविप नंदुरबार जिल्हा प्रमुख दिनेश खरात सर,शहर मंत्री निखिल महाजन होते. तर कार्यक्रमाला नवनिर्वाचित अधिसभा सदस्य व अभाविप पूर्व कार्यकर्ते, वर्तमान कार्यकर्ते, हितचिंतक आदि उपस्थित होते.








