म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवान दादाभाई बुवा व रुपाली बुवा यांची कन्या श्रावणी हिने नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकवला.
दंगल चित्रपटासारखी कहाणी घडवत दादाभाई बुवा यांनी पोरगी झाली तर काय झालं याप्रमाणे आपल्या मुलीला प्रशिक्षित करत कुस्ती क्षेत्रात नावलौकिक करण्याची जिद्द व चिकाटी च्या बळावर नंदुरबारच्या च्या वतीने नाशिक विभागात दुसरा क्रमांक पटकावला तरी समाज माध्यमातून आनंद व्यक्त केला जात आहे पैलवान दादा भाऊ व आई रूपाली बुवा यांच्याकडून ज्ञानाचे धडे उतरवत कुस्ती पाय रोवला आहे .
पोरगी झाली तर काय झालं माझं कुस्ती क्षेत्रात राहिलेला पूर्ण स्वप्न माझी मुलगी पूर्ण करेल आणि भविष्यात देशासाठी ऑलिम्पिक मधून गोल्ड मेडल मिळून दाखवेल.
पै. दादाभाई बुवा, रुपाली बुवा








